गणेश चौकातील खड्डे बुजवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:06+5:302021-01-03T04:21:06+5:30
अहमदनगर : बोल्हेगाव येथील गणेश चौकातील खड्डे बुजविण्याची मागणी येथील व्यावसायिक, नागरिकांनी केली आहे. यंदा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ...

गणेश चौकातील खड्डे बुजवा
अहमदनगर : बोल्हेगाव येथील गणेश चौकातील खड्डे बुजविण्याची मागणी येथील व्यावसायिक, नागरिकांनी केली आहे. यंदा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे गणेश चौक परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. येथील दुकानांसमोर वाहनेही व्यवस्थित लावली जात नाहीत. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
-------
कायनेटिक चौकातील सिग्नल सुरू करा
अहमदनगर : नियमित वर्दळ असलेल्या कायनेटिक (व्हीआरडीई) चौकातील सिग्नल सुरू करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. पुणे, दौंड, रेल्वेस्टेशन, नगर शहराकडे जाणारे रस्ते येथून जातात. त्यामुळे येथे दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. त्यामध्ये अवजड वाहनांची संख्या मोठी असते. तसेच रेल्वे उड्डाणपुलावरून येणारी वाहने वेगात येतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडीही होते. त्यामुळे सिग्नल सुरू करावेत, अशी मागणी केली जात आहे.