डाॅक्टर आत्महत्येप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:53+5:302021-07-09T04:14:53+5:30

अहमदनर : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील शासकीय आरोग्य उपकेंद्रात आत्महत्या करणाऱ्या डॉ. गणेश शेळके यांनी चिठ्ठीत ज्या अधिकाऱ्यांची नावे ...

File a homicide charge against those convicted in the doctor's suicide case | डाॅक्टर आत्महत्येप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

डाॅक्टर आत्महत्येप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

अहमदनर : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील शासकीय आरोग्य उपकेंद्रात आत्महत्या करणाऱ्या डॉ. गणेश शेळके यांनी चिठ्ठीत ज्या अधिकाऱ्यांची नावे लिहिली त्या सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.

यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपक गुगळे, सचिव अमित गांधी, शहराध्यक्ष शाहनवाज, तालुकाध्यक्ष सुशील साळवे, अमोल गायकवाड आदी उपस्थित होते. डॉ. गणेश शेळके यांनी संपूर्ण जीवघेण्या कोरोनाच्या काळात देखील आपली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. तरीही सतत होणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली. त्यांच्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोटप्रमाणे वैद्यकीय अधिकारी भगवान दराडे, तहसीलदार आणि कलेक्टर या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

-----------

फोटो- ०८जन आधार आंदोलन

करंजी येथील डाॅक्टर आत्महत्येप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे करण्यात आली.

Web Title: File a homicide charge against those convicted in the doctor's suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.