दिव्यांगास अपमानास्पद वागणूक दिल्यास गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:23+5:302021-01-03T04:21:23+5:30

अहमदनगर : कलम ९१ नुसार दिव्यांग व्यक्तीला अपमानास्पद वागणूक, दिव्यांगांचे शोषण, गैरवर्तणूक आदीनुसार दंडासह शिक्षेची तरतूद आहे; परंतु याबाबत ...

File a complaint if the disabled person is treated abusively | दिव्यांगास अपमानास्पद वागणूक दिल्यास गुन्हा दाखल करा

दिव्यांगास अपमानास्पद वागणूक दिल्यास गुन्हा दाखल करा

अहमदनगर : कलम ९१ नुसार दिव्यांग व्यक्तीला अपमानास्पद वागणूक, दिव्यांगांचे शोषण, गैरवर्तणूक आदीनुसार दंडासह शिक्षेची तरतूद आहे; परंतु याबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी व दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींना प्राधान्य व अग्रक्रम देण्यात यावा याकरिता जनआधार सामाजिक संघटनाप्रणीत दिव्यांग सेलच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना समाजात सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांचे हक्क व अधिकार अबाधित राहण्यासाठी दिव्यांग अधिकार कायदा २०१६ पारित केला आहे. या कायद्यात कलम ९२ नुसार दिव्यांग व्यक्तीला अपमानास्पद वागणूक, दिव्यांगांचे शोषण, गैरवर्तणूक आदीनुसार दंडासह शिक्षेची तरतूद आहे; परंतु याबाबत समाजात जागरूकता नाही. ती निर्माण व्हावी व दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींना प्राधान्य व अग्रक्रम देण्यात यावा याकरिता जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, तालुका संघटक विजय वाळके, जिल्हा अपंग सेलचे अध्यक्ष सोमनाथ पवार, शहराध्यक्ष शहानवाज शेख, मच्छिंद्र गांगर्डे, शिवाजी कुंदनकर, दीपक गुगळे, अमित गांधी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

-------

फोटो - ०१ जनआधार निवेदन

दिव्यांग व्यक्तीला अपमानास्पद वागणूक दिल्यास गुन्हा दाखल व्हावा या मागणीचे निवेदन जनआधार सामाजिक संघटनाप्रणीत दिव्यांग सेलच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले.

Web Title: File a complaint if the disabled person is treated abusively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.