अभिनेत्री कंगनावर पाथर्डीत गुन्हा दाखल करा, शिवसेनेतर्फे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 13:22 IST2020-09-09T13:21:38+5:302020-09-09T13:22:10+5:30

माणिकदौंडी (ता. पाथर्डी): राज्यभर वादात सापडलेली अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर आता पाथर्डीत गुन्हा दाखल करण्याची मागण करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.

File a case against actress Kangana in Pathardi, statement from Shiv Sena | अभिनेत्री कंगनावर पाथर्डीत गुन्हा दाखल करा, शिवसेनेतर्फे निवेदन

अभिनेत्री कंगनावर पाथर्डीत गुन्हा दाखल करा, शिवसेनेतर्फे निवेदन

माणिकदौंडी (ता. पाथर्डी): राज्यभर वादात सापडलेली अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर आता पाथर्डीत गुन्हा दाखल करण्याची मागण करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.

अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत  यांनी महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांच्या बेताल  वक्तव्यामुळे  महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. गुन्हा दाखल करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पाथर्डी शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश चितळे व तालुका उपसंघटक आसाराम ससे यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र व मुंबईची बदनामी करणाºया अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक रत्नपारखी  यांच्याकडे केली आहे.

Web Title: File a case against actress Kangana in Pathardi, statement from Shiv Sena