शेताच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:19+5:302021-01-08T05:04:19+5:30
कोपरगाव : शेतातील घासाला पाणी भरत असताना सामायिक बांधावरील झाडे तोडण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात शिवीगाळ करीत फावड्याने मारहाण ...

शेताच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी
कोपरगाव : शेतातील घासाला पाणी भरत असताना सामायिक बांधावरील झाडे तोडण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात शिवीगाळ करीत फावड्याने मारहाण करून एकमेकास जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील पानमळ्यात रविवारी (दि. ३ जानेवारी) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली.
या मारहाणीत ताजुद्दीन फकीर सय्यद व अदनान ताजुद्दीन सय्यद हे दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी ताजुद्दीन फकीरा सय्यद ( ४५, रा. पानमळा परिसर, चांदेकसारे, ता. कोपरगाव) यांच्या तक्रारीवरून युसुफ हुसेन सय्यद, युनुस हुसेन सय्यद (दोघे रा. पानमळा परिसर, चांदेकसारे ता. कोपरगाव ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर युनुस हुसेन सय्यद (३४, धंदा शेती, रा. पानमळा परिसर, चांदेकसारे ता.कोपरगाव) यांच्या तक्रारीवरून ताजुद्दीन फकीर सय्यद, अदनान ताजुद्दीन सय्यद (दोघे रा. पानमळा परिसर चांदेकसारे ता. कोपरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.