शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये पंचावन्न लाख भाविकांचे घरबसल्या साईदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 17:55 IST

कोरोनाच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी मंदिराची दारे बंद करण्यात आली. असे असले तरी भाविकांच्या श्रद्धेची दारे बंद होऊ शकले नाहीत. साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असूनही रोज सरासरी एक लाख अडतीस हजार भाविक घरबसल्या साईदर्शनाचा आनंद घेत असल्याचे समोर आले आहे.

     प्रमोद आहेर/      शिर्डी : कोरोनाच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी मंदिराची दारे बंद करण्यात आली. असे असले तरी भाविकांच्या श्रद्धेची दारे बंद होऊ शकले नाहीत. साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असूनही रोज सरासरी एक लाख अडतीस हजार भाविक घरबसल्या साईदर्शनाचा आनंद घेत असल्याचे समोर आले आहे.मंदिर बंदच्या काळात जवळपास ५५ लाख भाविकांनी वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप व टाटा स्कायच्या माध्यमातून घरबसल्या साईदर्शन घेतल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी १७ मार्च रोजी साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. त्यानंतर १८ मार्च ते २६ एप्रिल दरम्यान साडेतीन लाख लोकांनी साईबाबा संस्थानच्या वेबसाईटवरून बाबांचे दर्शन घेतले आहे. या माध्यमातून रोज सरासरी ८७६४ भाविक या सेवेचा लाभ घेत आहेत. याशिवाय साईबाबा संस्थानने टाटा स्कायला लाईव्ह दर्शनाचे हक्क दिले आहेत. टाटा स्कायवरून रोज एक लाखाहुन अधिक भाविक साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतात. मार्चमध्ये तब्बल साडेचार लाख नवीन दर्शकांची वाढ झाली आहे. अद्याप एप्रिलची माहिती टाटा स्कायकडे उपलब्ध नसल्याचे संस्थानचे आयटी विभागाचे प्रमुख अनिल शिंदे यांनी सांगितले.एक भाविक रोज सरासरी वीस मिनीटे लाईव्ह दर्शन घेत असतो असेही शिंदे यांनी सांगितले. टाटा स्कायवरूनही बंदच्या काळात चाळीस लाख भाविकांनी घरबसल्या साईदर्शन घेतले आहे. याखेरीज सुदर्शनसारखे राष्ट्रीय चॅनल व अनेक लोकल चॅनल रेकॉर्ड केलेल्या चारही आरत्या दाखवत असतात. त्या माध्यमातुनही अगणित भाविक साईबाबांशी जोडलेले आहेत, असेही डोंगरे यांनी सांगितले.एक लाख भाविकांकडे संस्थानचा अ‍ॅपसाईबाबा संस्थानने मोबाईल अ‍ॅप बनवलेला आहे. जगभरातील जवळपास एक लाखाहून अधिक भाविकांनी हा अ‍ॅप डाऊनलोड केलेला आहे़ रोज कमीतकमी पंचवीस हजार भाविक या अ‍ॅपच्या माध्यमातून साईबाबांशी जोडलेले असतात. या अ‍ॅपच्या मदतीने बंदच्या काळात आजवर दहा लाख भाविकांनी साई दर्शनाचा आनंद घेतलेला असावा, असे डोंगरे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSaibaba Mandirसाईबाबा मंदिरsaibabaसाईबाबाshirdiशिर्डी