पाचवीतील विद्यार्थीने शाळेसाठी दिली देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 19:09 IST2019-07-02T19:09:16+5:302019-07-02T19:09:20+5:30

थाटामाटात वाढदिवस साजरा करण्याच्या विविध प्रकार समाजात सर्रास होताना आपण नेहमी पाहतो.

Fifth student donates a gift for the school | पाचवीतील विद्यार्थीने शाळेसाठी दिली देणगी

पाचवीतील विद्यार्थीने शाळेसाठी दिली देणगी

चिचोंडी पाटील : थाटामाटात वाढदिवस साजरा करण्याच्या विविध प्रकार समाजात सर्रास होताना आपण नेहमी पाहतो. पण आपला वाढदिवस हा आपण शिक्षण घेत असलेल्या ज्ञानमंदिरास उभे करण्यासाठी मदतीचा हात देत इमारत बांधकामासाठी पाच हजाराची देणगी देऊन साजरा करण्याच्या पहिलाच उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात झाला.
शाळेत नुकताच प्रवेश घेऊन इयत्ता पाचवीत शिकत असलेली कु.अश्लेषा विठ्ठल जगताप या चिमुकलीने चक्क पाच हजाराची देणगी देत आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतिने साजरा करून समाजापुढे आदर्श ठेवला. आश्लेषा ने देणगीची रक्कम महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस कोकाटे, पर्यवेक्षक व्ही. एल नरवडे, जेष्ठ शिक्षक संपत मुठे यांचेकडे सुपुर्द केला. या वेळी बी.एल. मुखेकर उपस्थित होत्या.

 

 

 

 

Web Title: Fifth student donates a gift for the school