सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार
By Admin | Updated: August 23, 2014 00:44 IST2014-08-22T23:21:15+5:302014-08-23T00:44:14+5:30
नेवासा : अहमदनगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग सर्धेत नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या बारा विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक तर चार विद्यार्थ्यांनी रौप्यपदक पटकावले.

सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार
नेवासा : अहमदनगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग सर्धेत नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या बारा विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक तर चार विद्यार्थ्यांनी रौप्यपदक पटकावले. या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल या खेळाडूंचा सन्मान मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रशांत गडाख यांचे हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक शिंदे होते. स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य अॅड. के. एच. वाखुरे,अॅड. काकासाहेब गायके, उपप्राचार्य अरुण घनवट, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य छबुराव पानमंद, पर्यवेक्षक प्रा. दिगंबर कुलकर्णी उपस्थित होते. प्रशांत गडाख यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेते खेळाडू कु. प्रज्ञा देवखिळे, संकेत चव्हाण, अक्षय जायगुडे, प्रशांत काळे, किशोर पठाडे, पंकज कोकणे, संग्राम चव्हाण,अर्जुन जायगुडे, शरद वाखुरे,अमोल ससे, कृषिकेश घुले, किरण मगर या बारा खेळाडूंचा तर किरण डौले, मयूर शेळके, श्रीकृष्ण झरेकर,सुरज फुलकर या चार रौप्यपदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख प्रा. सुनील गर्जे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंची अहमदनगर येथे राज्य किकबॉक्सिंग असोशिएशनचे वतीने २२ आॅगष्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग सर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा स्पर्धेसाठी निवड झालेला महिला खो-खो संघाचा तसेच तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत उपविजेता संघाचा सत्कार झाला. (तालुका प्रतिनिधी)