बारमधील ललनाच्या प्रेमात पडला फौजदार; पत्नीने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 13:06 IST2020-07-15T13:05:35+5:302020-07-15T13:06:01+5:30
मुंबईतील बारमधील ललनाच्या प्रेमात पडलेल्या फौजदाराच्या पत्नीने रोजच्या छळास कंटाळून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१४ जुलै) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील थिटेसांगवी येथे घडली.

बारमधील ललनाच्या प्रेमात पडला फौजदार; पत्नीने केली आत्महत्या
श्रीगोंदा : मुंबईतील बारमधील ललनाच्या प्रेमात पडलेल्या फौजदाराच्या पत्नीने रोजच्या छळास कंटाळून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१४ जुलै) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील थिटेसांगवी येथे घडली.
अनिता पांडुरंग देवकाते (वय २७) असे आत्महत्या केलेल्या फौजदाराच्या पत्नीचे नाव आहे.
पांडुरंग देवकाते मुंबईत सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर काम करीत होता. यामुळे त्याचा मुंबईतील बारशी संपर्क आला. बारमधील छान, छबेल्या ललनींशी त्याची ओळख झाली. या ललनाच्या प्रेमात तो पडला. अनिताच्या वडिलांनी फौजदार जावयाची हौस पूर्ण करण्यासाठी स्वत:च्या नावावर त्याला चार चाकी गाडी घेऊन दिली होती. नंतर घरच्यांनी हुंड्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून अनिताचा छळ सुरू केला. या छळास कंटाळून अनिताने मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
मयत अनिताचे वडील कैलास कोकरे (रा.पारोडी, ता.शिरुर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंग देवकाते (पती), ज्ञानदेव देवकाते (सासरे) संध्या देवकाते (सासू), गणेश देवकाते (दिर) यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच मुंबईचा हा पोलीस अधिकारी फरार झाला. मात्र त्याला आम्ही बेड्या ठोकणार अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.