पित्याचा खून; पुत्रास जन्मठेप

By Admin | Updated: July 20, 2014 00:22 IST2014-07-19T23:38:50+5:302014-07-20T00:22:47+5:30

अहमदनगर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून वडिलांचा खून केल्याप्रकरणी मुलगा श्रीधर सोन्याबापू मिसाळ यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांनी जन्मठेपची शिक्षा ठोठावली आहे.

Father's blood; Son of life | पित्याचा खून; पुत्रास जन्मठेप

पित्याचा खून; पुत्रास जन्मठेप

अहमदनगर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून वडिलांचा खून केल्याप्रकरणी मुलगा श्रीधर सोन्याबापू मिसाळ (वय ४२, रा. तुळजाभवानी नगर, पाईपलाईन रोड,सावेडी) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांनी जन्मठेपची शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्यातील आरोपी श्रीधर याने २५ फेब्रुवारी २००७ रोजी दुपारच्या सुमारास वडील सोन्याबापू यशवंत मिसाळ यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. त्यांनी ते पैसे दिले नाहीत, याचा श्रीधरला राग आला. यातून आरोपी श्रीधर याने वडिलांच्या डोक्यात बत्ता मारून, जबर जखमी करून खून केला होता. या प्रकरणी श्रीधर याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खून खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती, त्याचा शनिवारी निकाल लागला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. गोरख मुसळे यांनी प्रत्यक्ष साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्षही महत्त्वपूर्ण ठरली. आरोपीविरुद्धचा सक्षम पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने श्रीधर यास जन्मठेप आणि एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

Web Title: Father's blood; Son of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.