बिबट्याच्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 17:48 IST2019-01-06T17:47:35+5:302019-01-06T17:48:42+5:30
शेतातील काम आटोपून घराकडे परत येत असलेल्या शेतकरी पिता-पुत्रावर बिबट्याने हल्ला केला.

बिबट्याच्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी
घारगाव : शेतातील काम आटोपून घराकडे परत येत असलेल्या शेतकरी पिता-पुत्रावर बिबट्याने हल्ला केला. त्यात एकजण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आंबी खालसा (ता.संगमनेर)परिसरात घडली आहे.
संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील रहिवासी नामदेव नाना पानसरे व त्यांचा मुलगा गणेश नामदेव पानसरे हे रविवारी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास कांद्याला पाणी भरून मोटारसायकल वरून घराकडे परत येत असतांना अचानक बिबट्याने हल्ला चढविला. गणेश पानसरे यांना बिबट्याने पंजा मारल्याने ते किरकोळ जखमी झाले असून पायावर जखमा झाल्या आहेत. सुदैवाने मोटारसायकलवर असल्याने दोघेही पिता-पुत्र बचावले.