बाबुर्डी घुमट येथे भीषण अपघात : दुचाकीस्वार ठार, जमावाने स्कॉर्पिओ पेटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 14:38 IST2018-08-15T14:38:24+5:302018-08-15T14:38:37+5:30

नगर तालुक्यातील अरणगाव ते वाळकी मार्गावर असणा-या बाबुर्डी घुमट गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

Fatal accidents at Baburdi Ghumat: Two-wheelers killed and mobilized Scorpio | बाबुर्डी घुमट येथे भीषण अपघात : दुचाकीस्वार ठार, जमावाने स्कॉर्पिओ पेटविली

बाबुर्डी घुमट येथे भीषण अपघात : दुचाकीस्वार ठार, जमावाने स्कॉर्पिओ पेटविली

केडगाव : नगर तालुक्यातील अरणगाव ते वाळकी मार्गावर असणा-या बाबुर्डी घुमट गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने स्कार्पिओ गाडी पेटवून दिली. जमावाला शांत करण्यासाठी पोलीस फौजफाटा पाचारण करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नगर तालुक्यातील अरणगाव येथून वाळकी गावाकडे जाणा-या मार्गावर बाबुर्डी घुमट गाव आहे. या गावातील सोमनाथ धमार्जी परभाने ( वय - ४१ बाबुर्डी घुमट) यांच्या दुचाकीला महिंद्रा टी.यु.व्ही - ३०० (एम. एच.- १६,बी.वाय.५४७०) या कंपनीच्या वाहनाने जोरदार धडक दिली. यात परभाने ठार झाले. हा अपघात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बाबुर्डी जवळ झाला. अपघाताची माहिती समजताच गावातील लोक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी संतप्त होऊन महिंद्रा कंपनीची गाडी पेटून दिली. गाडी पेटवल्याने तणाव निर्माण झाला. पोलीस घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस येईपर्यत चारचाकी वाहन जळाले होते.

Web Title: Fatal accidents at Baburdi Ghumat: Two-wheelers killed and mobilized Scorpio