श्रीरामपूर नेवासे महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार
By शिवाजी पवार | Updated: April 18, 2023 14:15 IST2023-04-18T14:14:35+5:302023-04-18T14:15:30+5:30
मंगळवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली.

श्रीरामपूर नेवासे महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर नेवासे महामार्गावर वडाळा महादेव नजीक दुचाकीच्या झालेल्या अपघातात नेवासा तालुक्यातील एक युवक ठार झाला. मंगळवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली.
मयताचे नाव द्रोणाचार्य दत्तात्रेय तुवर (वय २८, रा. पाचेगाव) असे आहे. कोपरगाव येथे दुचाकीवर नोकरीस जात असताना हा अपघात घडला. स्थानिक लोकांनी जखमी तुवर याला श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात भरती केले. मात्र डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तुवर याला मृत घोषित करण्यात आले.
अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी आई-वडील, दोन बहीण, चुलते, चुलत भाऊ असा परिवार आहे. अशोक साखर कारखान्याचे कर्मचारी दत्तात्रय तूवर यांचा तो मुलगा आहे.