भरतीसाठी तलाठी उमेदवारांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:27 IST2021-02-05T06:27:45+5:302021-02-05T06:27:45+5:30

यावेळी सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष संदीप लगड, प्रसाद बिराजदार, सतीश धरम, तुषार काळे, विजय मोरे, कांचन धाडगे, सोनाली जराड, ...

Fasting of Talathi candidates for recruitment | भरतीसाठी तलाठी उमेदवारांचे उपोषण

भरतीसाठी तलाठी उमेदवारांचे उपोषण

यावेळी सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष संदीप लगड, प्रसाद बिराजदार, सतीश धरम, तुषार काळे, विजय मोरे, कांचन धाडगे, सोनाली जराड, चंद्रकांत नवाळी, दत्ता कोळपे, जीवन हजारे, प्रवीण जाधव आदींसह तलाठी उमेदवार उपस्थित होते.

तलाठी भरतीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवार गेल्या वर्षभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या उमेदवारांनी वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात या विषयाचा पाठपुरावा करूनही अद्याप त्यांना ठोस आश्‍वासन मिळालेले नाही. २ डिसेंबर, २०२०च्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार, त्यांना लवकरात लवकर नियुक्ती मिळणे अपेक्षित होते, तरीही ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता सुरू होईपर्यंत विविध कारणे देऊन विषय प्रलंबित ठेवण्यात आला होता, परंतु आता आचारसंहिता संपली, तरीही प्रशासनाच्या वतीने लेखी स्वरूपात प्रकटन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन तलाठी भरतीची अंतिम निवड यादी जाहीर करण्याची मागणी तलाठी उमेदवारांनी केली आहे.

---------------

फोटो - २९तलाठी

तलाठी भरतीमध्ये दिरंगाई होत असल्याने त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने तलाठी उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयजवळ उपोषण सुरू केले आहे.

Web Title: Fasting of Talathi candidates for recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.