अण्णा हजारेंना पाठिंब्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:55+5:302021-02-05T06:35:55+5:30

दोन वर्षापूर्वी पद्मभूषण अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर आमरण उपोषण केले होते. उपोषणाच्या सातव्या दिवशी सरकारने स्वामीनाथन आयोग ...

Fasting in support of Anna Hazare | अण्णा हजारेंना पाठिंब्यासाठी उपोषण

अण्णा हजारेंना पाठिंब्यासाठी उपोषण

दोन वर्षापूर्वी पद्मभूषण अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर आमरण उपोषण केले होते. उपोषणाच्या सातव्या दिवशी सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करू, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु अद्याप त्याची कार्यवाही सरकार करू शकली नाही.

त्यामुळे अण्णा हजारे ३० जानेवारीपासून केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी हितासाठी उपोषण करणार आहेत. सरकारने अण्णांना दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी, त्यांना या वयात उपोषणाची वेळ येऊ नये म्हणून अण्णांच्या उपोषणापूर्वी केंद्र सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विलास वाघमारे उपोषणास बसले आहेत.

यापूर्वी विलास वाघमारे यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी अनेकवेळा उपोषण केले असून, अण्णांना पाठिंब्यासाठी त्यांच्या उपोषणापूर्वी २००८ व २००९ साली असे दोनदा उपोषणास बसले होते.

स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित राहून वाघमारे यांना पाठिंबा देत आहेत.

Web Title: Fasting in support of Anna Hazare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.