शेतकऱ्यांना उपक्रमांचा लाभ मिळवून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:33+5:302021-02-06T04:36:33+5:30
कोपरगाव येथे इंडियन फार्मर्स फर्टीलायझर्स को आॅपरेटीव्ह मर्यादित, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि शेतकरी सहकारी संघ, ...

शेतकऱ्यांना उपक्रमांचा लाभ मिळवून देणार
कोपरगाव येथे इंडियन फार्मर्स फर्टीलायझर्स को आॅपरेटीव्ह मर्यादित, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि शेतकरी सहकारी संघ, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच उसतोडणी कामगारांना विवेक कोल्हे यांच्या हस्ते उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी इफकोचे विभागीय व्यवस्थापक दिनेश देसाई, फिल्ड ऑफिसर तुषार गोरड, इश्वर चोखर, शेतकी अधिकारी जी. बी. शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजी देवकर, ज्ञानेश्वर गायकवाड उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले, उस तोडणी कामगार हे आपले गाव, कुटूंब सोडून दूरवर उस तोडणी येत असतात. उन, थंडी, पाउस कशाचीही तमा न करता हे कामगार रात्रंदिवस काम करीत असतात. त्यांना मायेची उब देण्याच्या भावनेतून ब्लॅंकेटचे वाटप करता आले. शेतकरी सहकारी संघाचे व्यवस्थापक हरिभाउ गोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
040221\img-20210203-wa0074.jpg
कोपरगाव येथील सहकार महर्षीं कोल्हे कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी कामगारांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विवेक कोल्हे, दिनेश देसाई, तुषार गोरड, हरिभाऊ गोरे, जी. बी. शिंदे.