शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात एकाच दिवसी दोन कर्जबाजारी शेतक-यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 19:01 IST

नगर तालुक्यातील मेहेकरी गावात सुभाष आप्पा बडे (वय ५०)  या शेतक-याने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. जामखेड तालुक्यातही शेतकरी बाबासाहेब राऊ गोयकर (वय ४८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देएकाच दिवसात दोन शेतक-यांनी संपविली जीवनयात्रा नगर तालुक्यात सावकारी जाचाला कंटाळून घेतला गळफासजामखेड तालुक्यातही कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

केडगाव/ जामखेड : नगर तालुक्यातील मेहेकरी गावात सुभाष आप्पा बडे (वय ५०)  या शेतक-याने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. जामखेड तालुक्यातील गोयकरवाडी येथील शेतकरी बाबासाहेब राऊ गोयकर (वय ४८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सावकाराने बडे यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे बडे कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. बडे यांच्या जवळ सावकाराच्या नावाने चिठ्ठी सापडली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.मयत सुभाष बडे यांच्या खिशात ही चिठ्ठी सापडल्याने पोलीस आता खासगी सावकारांच्या विरोधात काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेहेकरी येथील गावक-यांनी बडे यांना शिवीगाळ करणा-या सावकाराच्या विरोधात संताप व्यक्त केल्याने तो फरार झाल्याचीही माहिती समजली आहे. मयत बडे यांच्यावर खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज जवळपास एक ते दीड लाख रुपये होते. तो सावकार त्यांच्याकडून दहा ते पंधरा टक्के  व्याजाने पैसे वसूल करीत होता. सध्या आर्थिकदृष्ट्या बडे अडचणीत असल्याने वेळोवेळी व्याज देता येत नसल्याने सावकाराने थेट बडे यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली होती. याचा त्रास बडे यांना झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असून सावकाराला योग्य शिक्षा व्हावी अशी मागणी गावातून केली जात आहे. दरम्यान बडे यांच्या आत्महत्येबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या घटनेमुळे मेहेकरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

खासगी सावकारांची वसुुली

नगर तालुक्यातील अनेक गावांत काही ठराविक सावकार दहा ते पंधरा टक्क्याने गोरगरिबांना पैसे देऊन दामदुप्पट वसूल करतात. त्यामुळे वेळेत पैसा सावकाराकडे जात नाही. त्यामुळे आणखीच शेतकरी कर्जबाजारी होतो आहे. कर्जाचा आकडा दिवसेंदिवस फुगत जाऊन ते फेडणे गोरगरिबांना अशक्य होते. सावकाराचा वसुलीसाठी जाच सुरू होतो.या त्रासातून गोरगरीब आत्महत्या करीत असल्याने या सावकारशाही विरोधात आता कार्यवाही होणार का असा प्रश्न सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत.

गोयकरवाडीतही कर्जबाजारी शेतक-याने घेतला गळफास

जामखेड : तालुक्यातील गोयकरवाडी येथील शेतकरी बाबासाहेब राऊ गोयकर (वय ४८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.  हा प्रकार बुधवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आला. गोयकर यांनी स्वत:च्या शेतातच आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. गोयकर यांना अडीच एकर जमीन आहे. त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याबाबतची खबर पोलीस पाटील कांतिलाल वाळुंजकर यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण यांनी पंचनामा केला. बुधवारी दुपारी गोयकर यांच्यावर त्यांच्याच शेतात अंत्यविधी करण्यात आला. गोयकर यांच्यामागे वडील, एक भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर