नेवासा फाटा येथे शेतकरी रस्त्यावर

By | Updated: December 5, 2020 04:36 IST2020-12-05T04:36:47+5:302020-12-05T04:36:47+5:30

नेवासा फाटा : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घेण्यात यावेत आणि दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा ...

Farmers on the street at Nevasa Fata | नेवासा फाटा येथे शेतकरी रस्त्यावर

नेवासा फाटा येथे शेतकरी रस्त्यावर

नेवासा फाटा : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घेण्यात यावेत आणि दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कॉ. बाबा आरगडे यांच्या नेतृत्वाखाली किसान सभा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक गुरुवारी सकाळी पावणे बारा वाजता नेवासा फाटा येथे नगर - औरंगाबाद रस्त्यावर आले.

केंद्र सरकारने केलेले तीनही कृषी कायदे हे शेतकरी हिताच्या विरुद्ध असून भांडवलदार धार्जीणे आहेत. शेती कार्पोरेट क्षेत्राच्या घशात घालणाऱ्या या कायद्यामुळे शेतकरी उद‌्ध्वस्त होणार आहे. कायद्यात हमीभावाची तसेच किमान आधारभूत भावाची कुठलीही तरतूद नाही. कायद्यामुळे मार्केट कमिट्या मोडीत निघणार असून, शेतकऱ्यांचे एक प्रकारे संरक्षण काढून घेण्याचा हा प्रकार आहे. नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना गुलाम बनविण्याचे षड‌्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे हे तिन्ही कृषी कायदे त्वरित मागे घ्यावेत. वीज कायदा २०२० हा विजेसंबंधित सर्व खाजगीकरणास प्रोत्साहन देणारा व वीज क्षेत्र भाडवलदारांच्या ताब्यात देणारा आहे. तो मागे घेण्यात यावा. हमीभावाचा कायदा करण्यात यावा या मागण्याचे निवेदन आंदोलकांनी महामार्गावर मध्यभागी येत तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना दिले.

तत्पूर्वी, भोसले पेट्रोल पंपाच्या आवारात आंदोलकांनी छोटी सभा घेतली. वक्त्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा समाचार घेतला. उसाला प्रतिटन ३ हजार ५०० रुपये भाव मिळावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी कॉ. बाबा आरगडे, कॉ. बन्सी सातपुते, ॲड. वंसत नवले आदींची भाषणे झाली. याप्रसंगी दादा नाबदे, कॉ. आप्पासाहेब वाबळे, कॉ. भारत आरगडे, भागचंद चावरे, दिगंबर गोंधळी, मुकुंद ठोंबरे, भाऊसाहेब आरगडे, कॉ. लक्ष्मण कडू, बापूसाहेब आढागळे, भास्कर लिहिणार, रावसाहेब मगर, दत्तात्रय वाकचौरे, नामदेव गोरे, गणेश झगरे, भाऊसाहेब दारकुंडे, रज्जाक सय्यद, पेत्रस साळवे आदी उपस्थित होते.

फोटो : ०३ नेवासा फाटा आंदोलन

नेवासा फाटा येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

Web Title: Farmers on the street at Nevasa Fata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.