शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:28+5:302021-06-10T04:15:28+5:30
देवदैठण : शेतकऱ्यांनी बियाणे बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन श्रीगोंदा तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी श्रीगोंदा तालुक्यातील ...

शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी
देवदैठण : शेतकऱ्यांनी बियाणे बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन श्रीगोंदा तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे शेतकऱ्यांना केले. त्यामुळे बुरशी, कीड रोगांपासून पिकांचे सरंक्षण होते.
महाराष्ट्र सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र (पेज) व महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने देवदैठण, येवती व पिंप्री कोलंदर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप हंगामातील पिकांसाठी बीजप्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. परिसरात गत आठवड्यात चांगला पाऊस झाला. आता शेतकऱ्यांची खरिपातील पेरणीची लगबग सुरू झाली. त्यामुळे देवदैठण येथे गणराज कृषी गटाचे अध्यक्ष शिवाजी वाघमारे यांच्या नियोजनामधून मूग बियाणे बीजप्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक नीलेश गायकवाड यांनी दाखविले.
येवती येथे शेतकरी बाजीराव ठोंबरे यांनी तूर व पिंप्री कोलंदर येथे जनार्दन ओहोळ यांनी बाजरी बियाणे बीजप्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, सहाय्यक कृषी अधिकारी प्रतीक कांबळे, माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ, सोपाना वाघमारे, दगडू वाघमारे, तुषार वाघमारे, अमोल कौठाळे व शेतकरी उपस्थित होते.
090621\img-20210607-wa0088.jpg~090621\img-20210607-wa0071.jpg
देवदैठण येथे शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी . ( छायाचित्र - संदीप घावटे )~देवदैठण येथील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पेरणी साठी बीज प्रक्रीयेचे मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी . ( छायाचित्र - संदीप घावटे )