शेतक-याच्या घराला आग : संसारपयोगी साहित्यासह तीन गाई ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 18:00 IST2018-10-12T17:59:59+5:302018-10-12T18:00:03+5:30

गोरक्षवाडी निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथे आज दुपारी लागलेल्या आगीत तीन गाई अन्नधान्य पन्नास हजार रुपये रोख संसार उपयोगी साहित्य असा ऐवज जळून खाक झाला.

Farmer's house fire: Three cows killed along with the useful literature | शेतक-याच्या घराला आग : संसारपयोगी साहित्यासह तीन गाई ठार

शेतक-याच्या घराला आग : संसारपयोगी साहित्यासह तीन गाई ठार

आश्वी : गोरक्षवाडी निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथे आज दुपारी लागलेल्या आगीत तीन गाई अन्नधान्य पन्नास हजार रुपये रोख संसार उपयोगी साहित्य असा ऐवज जळून खाक झाला.
निमगावजाळी लोहारे रस्तयावरील गोरक्षवाडी येथील बाळासाहेब काशीनाथ सदाफळ यांच्या घराला व शेजारील गोठ्याला आज दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमाराला अचानक आग लागली. या आगीत घरातील संसार उपयोगी साहीत्य पन्नास हजार रुपये रोख, अन्नधान्य आदी आगीच्या विळख्यात सापडले. आॅक्टोबर हीट मध्ये भर उन्हात लागलेल्या भयानक आगीने उग्र रुप घेत जनावरांना वाचवण्याची ही संधी दिली नाही. यात तीन गाई मृत्युमुखी पडल्या. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. स्थानिक तरुणांनी तसेच अग्नीक्षमक दलाचा बंबानी आग आटोक्यात आणली. जळीतग्रस्त कुटुंबाला तातडीने शासनाने मदत करावी, अशी मागणी संगमनेर दुध संघाच्या संचालिका प्रतिभाताई जोंधळे यांनी केली आहे.

 

Web Title: Farmer's house fire: Three cows killed along with the useful literature