शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची बिबट्याशी झुंज

By admin | Updated: January 16, 2016 23:08 IST

राहुरी : मल्हारवाडी येथील शेतकरी संजय जाधव यांनी चार मिनिटे बिबट्याशी झुंज देऊन त्याला पळवून लावले.

राहुरी : शेतात फिरत असताना अचानक बिबट्याने अंगावर झडप घातली़ हा प्रसंग कथन करतानाही अंगावर शहारे येतात, परंतु मल्हारवाडी येथील शेतकरी संजय जाधव यांनी चार मिनिटे बिबट्याशी झुंज देऊन त्याला पळवून लावले. यात जाधव किरकोळ जखमी झाले. नशीब बलवत्तर व थोडेसे धाडस दाखवले म्हणून बचावलो, असे सांगताना जाधव यांचा अजूनही थरकाप उडतो.शुक्रवारी दुपारी राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी येथील शेतकरी संजय लक्ष्मण जाधव हे नेहमीप्रमाणे आपल्या डाळिंब शेतीची पाहणी करीत होते़ काही वेळेने त्यांना कडवळ शेताच्या दिशेने अचानक गुरगुरण्याचा आवाज आला. त्यामुळे ते थबकले. परंतु त्यांना सावरण्याच्या आधीच बिबट्याने जाधव यांच्या अंगावर झेप घेऊन त्यांना खाली पाडले. जमेल तेवढा प्रतिकार करण्यापलीकडे जाधव यांच्या हातात काहीच नव्हते. परंतु दुसऱ्याच क्षणी जाधव यांच्या हाताला जवळच पडलेले लोखंडी दाताळ लागले. त्याच्या आधारे त्यांनी बिबट्याचे तोंड दाबले. त्यामुळे बिबट्याने जाधव यांना काही वेळ सोडले. परंतु तो आणखी चवताळलेला होता. जाधव यांच्या दिशेने कूच करणार तोपर्यंत त्यांनी चोरात किंकाळी फोडली. त्यांच्या आवाजाने बिबट्या थोडा गांगरला. तो आवाज ऐकून जवळच्या शेतातच पाणी धरीत असलेले त्यांचे बंधू रामदास व भास्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली. विलास गागरे, जगन्नाथ गाडे हे शेजारीही धावले. सर्वजण बिबट्याच्या दिशेने येत असल्याचे पाहून बिबट्याने ओढ्याच्या दिशेने पलायन केले. जखमी जाधव यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचारानंतर जाधव यांना घरी सोडण्यात आले असले तरी ते अजूनही भीतीच्या सावटाखाली आहे़ वन विभागाचे चंद्रकांत गाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला़