पुणतांब्यात पुन्हा शेतक-यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 15:32 IST2017-10-02T15:31:08+5:302017-10-02T15:32:42+5:30

पुणतांबा : राज्यात शेतकरी आंदोलनाचा लढा सुरू करणा-या पुणतांब्यातून येत्या २० आॅक्टोबरला दिवाळीतील बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर शेतक-यांच्या प्रश्नावर देशव्यापी लढ्याचा एल्गार पुकारण्यात येणार आहे.

 Farmers' Elgar Again in Punishment | पुणतांब्यात पुन्हा शेतक-यांचा एल्गार

पुणतांब्यात पुन्हा शेतक-यांचा एल्गार

ठळक मुद्देदेशव्यापी लढ्यासाठी २० आॅक्टोबरला मेळावा

पुणतांबा : राज्यात शेतकरी आंदोलनाचा लढा सुरू करणा-या पुणतांब्यातून येत्या २० आॅक्टोबरला दिवाळीतील बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर शेतक-यांच्या प्रश्नावर देशव्यापी लढ्याचा एल्गार पुकारण्यात येणार आहे.
राज्यात शेतकरी आंदोलनाची ज्योत पेटविणाºया किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांनी सोमवारी ही माहिती दिली. देशव्यापी लढ्याचे नियोजन २० तारखेच्या मेळाव्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणतांबा पुन्हा चळवळीचे केंद्र ठरणार आहे. राज्यातील शेतकºयांच्या अभूतपूर्व संपाला १ जूनपासून पुणतांब्यातून सुरूवात झाली होती. या संपाचे लोण राज्यात पोहोचवून सरकारला दीड लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी योजना जाहीर करावी लागली. पुणतांब्यातील शेतकरी संप राज्यभरात पसरल्यानंतर राज्यभरातील शेतकरी आंदोलनाचे केंद्र म्हणून पुणतांब्याचे नाव राज्यभरात पोहोचले. कर्जमाफी योजना जाहीर झाली असली तरी शेतकºयांचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्यासाठी देशव्यापी आंदोलनाची गरज आहे. त्याच्या नियोजनासाठी २० आॅक्टोबरला पुणतांब्यात देशव्यापी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केल्याचे जाधव यांनी सांगितले.

Web Title:  Farmers' Elgar Again in Punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.