शेतकऱ्याच्या गायीला मिळाली १ लाख ६१ हजारांची किंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:22 IST2021-07-31T04:22:35+5:302021-07-31T04:22:35+5:30

कोपरगाव : तालुक्यातील कुंभारी येथील रहिवासी अरुण रघुनाथ कदम यांंची एच एफ होस्टेन दुसऱ्या वेताच्या पाच वर्षे वयाच्या गायीची ...

The farmer's cow got a price of 1 lakh 61 thousand | शेतकऱ्याच्या गायीला मिळाली १ लाख ६१ हजारांची किंमत

शेतकऱ्याच्या गायीला मिळाली १ लाख ६१ हजारांची किंमत

कोपरगाव : तालुक्यातील कुंभारी येथील रहिवासी अरुण रघुनाथ कदम यांंची एच एफ होस्टेन दुसऱ्या वेताच्या पाच वर्षे वयाच्या गायीची गुरुवारी (दि.२९) विक्री केली असता तब्बल १ लाख ६१ हजार रुपयांची किंमत मिळाली आहे. राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील व्यापारी सिकंदर पठाण यांनी रोख रक्कम देत खरेदी केली आहे. विशेष म्हणजे कदम यांनी गावातून चक्क वाजतगाजत मिरवणूक काढून या गायीची पाठवणी केली आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी गाण्यावर ठेका धरला होता.

कदम म्हणाले, मागील वेतामध्ये गायीने २७ लिटर दूध दिले होते. या वेळेला ३० लिटरच्या पुढे गाय दूध देईल. गोठ्यात सर्व एच एफ होस्टेन जातीच्या गायी असून, खाद्य, चारा, पोषक घटकांचा समावेश वेळोवेळी खुराकामध्ये केलेला असतो. एक हेक्टर क्षेत्रावर केवळ चारा पिकांची लागवड केलेली असल्याने मेहनतीच्या जोरावर भरघोस उत्पन्न मिळत आहे. यावेळी कोळपेवाडी येथील मध्यस्थी राजेंद्र महाजन, व्यापारी सिकंदर पठाण व अरुण कदम यांचा गावकऱ्यांनी फेटा बांधून सत्कार केला. दरम्यान, गायीचा सांभाळ केलेल्या कदम कुटुंबीयांनी गळ्यात पडत साश्रुनयनांनी दिलेला निरोप बघता गावकरीही भावुक झाले होते.

...............

३०- गाय मिरवणूक फोटो- कोपरगाव

Web Title: The farmer's cow got a price of 1 lakh 61 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.