कर्जतमध्ये कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 12:00 IST2018-04-18T12:00:34+5:302018-04-18T12:00:45+5:30

कर्जत तालुक्यातील शिंदा या गावातील दत्तात्रय देवराव घालमे (वय ४२) या तरुण शेतक-याने कर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपवली. सेवा संस्थेसह खासगी कर्जाला कटांळून विष पिऊन घालमे यांनी आत्महत्या केली.

Farmer suicides in debt | कर्जतमध्ये कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

कर्जतमध्ये कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील शिंदा या गावातील दत्तात्रय देवराव घालमे (वय ४२) या तरुण शेतक-याने कर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपवली. सेवा संस्थेसह खासगी कर्जाला कटांळून विष पिऊन घालमे यांनी आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी व पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
सोमवार १६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घालमे यांनी विष प्राशन केले. जमीन कमी आहे, यामध्ये फार काही पिकत नाही. पिकलेच तर भाव मिळत नाही. सेवा सोसायटीचे एक लाखापेक्षा जास्त तर खासगी सावकाराचे दीडलाख कर्ज आहे. शेती उत्पनामधून पोटही भरू शकत नाही त्यामुळे कर्ज कसे फेडणार? असे त्यांनी विष पिल्यानंतर पुतण्याला सांगितले. त्यानंतर तात्काळा त्यांना तत्काळ नगर येथे शासकीय रुग्णालयात हजर केले. मात्र डॉक्टरांनी घालमे यांना मृत घोषित केले.

Web Title: Farmer suicides in debt