वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, श्रीरामपूर तालुक्यातील घटना

By शिवाजी पवार | Updated: March 18, 2023 19:12 IST2023-03-18T19:11:40+5:302023-03-18T19:12:32+5:30

मृत व्यक्तीचे नाव राजू नामदेव मोरे (वय ५०) असे आहे. दुपारी पावणे पाच वाजता ही दुर्घटना घडली.

Farmer dies due to lightning, incident in Srirampur taluka | वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, श्रीरामपूर तालुक्यातील घटना

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, श्रीरामपूर तालुक्यातील घटना

श्रीरामपूर - शनिवारी दुपारी श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या पावसात वीज कोसळून भोकर येथील एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी ही माहिती दिली.

मृत व्यक्तीचे नाव राजू नामदेव मोरे (वय ५०) असे आहे. दुपारी पावणे पाच वाजता ही दुर्घटना घडली. अंगावर वीज पडल्याने मोरे हे जखमी झाले होते. त्यांना स्थानिक लोकांनी तातडीने श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मोरे यांचा मृत्यू झाला. वीज कोसळून मोरे यांची एक गायदेखील यावेळी दगावली.

   दरम्यान, शनिवारी तालुक्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. श्रीरामपूर शहरात गारांचा पाऊस झाला. सुमारे अर्धा तास पाऊस पडला. यावेळी विजांचा कडकडाट सुरू होता. काढणीला आलेल्या गहू तसेच द्राक्ष बागांचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 
 

Web Title: Farmer dies due to lightning, incident in Srirampur taluka

टॅग्स :Farmerशेतकरी