महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू
By शिवाजी पवार | Updated: March 28, 2024 13:56 IST2024-03-28T13:54:49+5:302024-03-28T13:56:44+5:30
उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू
शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील ऐनतपूर सुभाषवाडी रस्त्यावरील तरुण शेतकरी सागर भांड याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारांना धक्का लागल्याने ही घटना घडली. स्थानिक शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या विरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
बुधवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. शेतात कामानिमित्त गेलेला सागर हा घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीय शेतात आले असता हा प्रकार समोर आला. बुधवारी सकाळपर्यंत महावितरण कंपनीने पंचनामा केलेला नव्हता. सागर याला तातडीने श्रीरामपूर शहरात साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.