दूध घालणे बंद केल्याने शेतकऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:19 IST2021-05-14T04:19:41+5:302021-05-14T04:19:41+5:30

गणेश जगन्नाथ चंद्रे (वय ४५, रा. गुहा) यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दाखल केली. १० मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजे ...

Farmer beaten for stopping milking | दूध घालणे बंद केल्याने शेतकऱ्याला मारहाण

दूध घालणे बंद केल्याने शेतकऱ्याला मारहाण

गणेश जगन्नाथ चंद्रे (वय ४५, रा. गुहा) यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दाखल केली.

१० मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान फिर्यादी गणेश चंद्रे हे घरासमोर बसले होते. तेव्हा आरोपी राजेंद्र माणिक कोळसे (रा. गुहा) हा तेथे आला. तू माझ्या डेअरीत दूध घालणे अचानक बंद का केले. कोळसे याने गणेश चंद्रे यांना शिवीगाळ करून तेथे पडलेल्या लाकडी काठीने त्यांना जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत गणेश चंद्रे यांचा हात मोडला. तू जर माझ्याविरुद्ध पोलीस तक्रार केली तर तुला गावात येऊ देणार नाही. तुला जिवंत सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

आरोपी राजेंद्र कोळसे हा सध्या पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विठ्ठल राठोड हे करीत आहेत.

Web Title: Farmer beaten for stopping milking