बनावट दारूसाठा जप्त

By Admin | Updated: April 15, 2016 00:32 IST2016-04-15T00:02:57+5:302016-04-15T00:32:01+5:30

श्रीरामपूर : जयंती, सण, उत्सवांच्या काळात श्रीरामपूरमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट दारू विक्रीसाठी आणलेला साठा सहायक पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुरूवारी उघडकीस आणला.

Fake counterfeit seized | बनावट दारूसाठा जप्त

बनावट दारूसाठा जप्त

श्रीरामपूर : जयंती, सण, उत्सवांच्या काळात श्रीरामपूरमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट दारू विक्रीसाठी आणलेला साठा सहायक पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुरूवारी उघडकीस आणला. यात गेल्या अनेक वर्षांपासून दमण दारू तस्करीत कार्यरत असलेल्या मनोज रायपेल्लीसह दोघांना अटक करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस नाईक विजयकुमार ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून मनोज रायपल्ली व राहूल बायू फुलारे (रा. वडारवाडा, गोंधवणी, श्रीरामपूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरूवारी सकाळी ११.३० वाजता ही कारवाई केली. यात ७७ हजार ७७० रूपये किंमतीचा विविध कंपन्यांचा बनावट दारू साठा जप्त करण्यात आला.
गोंधवणी वडारवाडा येथील फुलारे याच्या घरातून ११ हजार ५०० रूपये किंमतीच्या महाराष्ट्र राज्यात परवानगी नसलेल्या बाटल्या सापडल्या. अरूणाचल प्रदेशामध्येच विक्रीसाठी असलेला हा मद्यसाठा होता. ३३ हजार २० रूपये किंमतीच्या महाराष्ट्रात विक्रीस परवानगी नसलेल्या १५६ बाटल्या जप्त करण्यात आल्या. मध्य प्रदेशातच विक्रीसाठी परवाना असलेल्या काही बाटल्या जप्त करण्यात आला. तसेच २०० लिटर रासायनिक पदार्थांनी भरलेला साठाही जप्त करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Fake counterfeit seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.