साडेसोळा लाखांच्या साखरेचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:16 IST2021-07-21T04:16:09+5:302021-07-21T04:16:09+5:30
मनोज गोकुळदास मानुधने (रा. एरंडोल, जि. जळगाव), वाहन क्रमांक एमएच-१८, बीए-५७८७ वरील चालक, वाहन क्रमांक एमएच-०९, एचएच-२४६२ वरील चालक ...

साडेसोळा लाखांच्या साखरेचा अपहार
मनोज गोकुळदास मानुधने (रा. एरंडोल, जि. जळगाव), वाहन क्रमांक एमएच-१८, बीए-५७८७ वरील चालक, वाहन क्रमांक एमएच-०९, एचएच-२४६२ वरील चालक यांच्याविरोधात मंजुश्री महेश करवा (रा. संजीवराजेनगर, गिरवी नाका, अपर्णा अपार्टमेंटशेजारी, फलटण, ता. फलटण, जि. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करवा यांनी संगमनेरातून साखर खरेदी केली होती. ती साखर प्रकाशचंद हुकूमचंद ओसवाल यांना पाठविण्यास सांगितले होते. मात्र, गुन्हा दाखल झालेल्या वरील तिघांनी ती साखर परस्पर इतर व्यापाऱ्यांना विकली. साखर पोहोच न झाल्याने संबंधित व्यापाऱ्याने चौकशी केली असता साखरेचा अपहार झाल्याचे समोर झाले. साखर पोहोचविण्याची जबाबदारी असलेल्यांना याबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत करवा यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे अधिक तपास करत आहेत.