पाचशे डॉलरसह आठ तोळे सोने लांबविले; चोरटे सीसीटिव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 17:00 IST2021-01-19T16:59:08+5:302021-01-19T17:00:08+5:30
शेवगाव-गेवराई मार्गावरील चापडगाव येथील मध्यवस्तीत चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारतीचा लोखंडी दरवाजा तोडून साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, ५०० परकीय डाॅलरसह रोख ८० हजार रुपये लंपास केले. ही घटना मंगळवारी (दि.१९) पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान घडली असून चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले आहेत.

पाचशे डॉलरसह आठ तोळे सोने लांबविले; चोरटे सीसीटिव्हीत कैद
बोधेगाव : शेवगाव-गेवराई मार्गावरील चापडगाव येथील मध्यवस्तीत चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारतीचा लोखंडी दरवाजा तोडून साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, ५०० परकीय डाॅलरसह रोख ८० हजार रुपये लंपास केले. ही घटना मंगळवारी (दि.१९) पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान घडली असून चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले आहेत.
चापडगाव गावठाणमध्ये शेवगाव-गेवराई मार्गालगत डाॅ. ज्ञानेश्वर आंबादास दहिफळे यांचा तीन मजली बंगला आहे. डाॅ.दहिफळे हे पत्नी नलिनीच्या प्रसुतीनिमित्त दहा दिवसांपासून आपल्या कुटूंबासह अहमदनगर येथे गेलेले होते. येथील बंगल्यात कंपाउंडर बाजीराव पातकळ हा एकटाच राहत असे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी बंगल्याचा पाठीमागील लोखंडी शटर व चॅनेल गेटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी काही चोरटे जवळील शेतात उभे होते. आत प्रवेश केल्यावर चोरट्यांनी तळ मजला, पहिल्या मजल्यावरील दवाखान्याची ओपेडी कक्ष, दुसऱ्या मजल्यावरील राहत्या खोल्या व तिसऱ्या मजल्यावरील स्टोअर रूममधील सामानाची उचकापाचक केली. बेडरूममधील साहित्याची उचकापाचक करून चोरट्यांनी त्यातील ५ सोन्याच्या अंगठ्या, गंठण, चैन असे अंदाजे साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, बॅगेतील ५०० परकीय डाॅलरसह रोख ८० हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. सदरील प्रकार सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून पाच ते सहा चोरटे दिसून आले आहेत.