कृषी दुकानांची वेळ वाढवून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:38+5:302021-06-02T04:17:38+5:30
निवेदनात म्हटले आहे, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेनअंतर्गत घालण्यात आलेल्या निर्बंधाचा कालावधी राज्य सरकारने १५ जूनपर्यंत वाढवला आहे. ...

कृषी दुकानांची वेळ वाढवून द्या
निवेदनात म्हटले आहे, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेनअंतर्गत घालण्यात आलेल्या निर्बंधाचा कालावधी राज्य सरकारने १५ जूनपर्यंत वाढवला आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या शेती व्यवसायाशी निगडित कृषी सेवा दुकानांना सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र सध्याची वेळ कमी असल्याने शेतकऱ्यांची खरेदीची कामे पूर्ण होत नाही. परिणामी अर्धवट खरेदी करून शेतकऱ्यांना घरी परतावे लागते आहे. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून मान्सून दाखल होण्याअगोदर शेतीविषयक कामे उरकण्यासाठी सध्याची वेळ शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील काही गावात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीपाची लगबग सुरू झाली आहे.