परवाना शुल्कसाठी मुदतवाढ द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:16+5:302021-07-14T04:24:16+5:30
निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, विलास कराळे, उपाध्यक्ष दत्ता वामन, सचिव अशोक औसीकर, लतीफ शेख, गणेश आटोळे, कयूम ...

परवाना शुल्कसाठी मुदतवाढ द्यावी
निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, विलास कराळे, उपाध्यक्ष दत्ता वामन, सचिव अशोक औसीकर, लतीफ शेख, गणेश आटोळे, कयूम सय्यद, आरिफ शेख, ईश्वर शेलार, फारुक शेख, धनेश गायकवाड, दत्ता जाधव, सचिन गवळी आदी उपस्थित होते.
२०१४ मध्ये परवाना शुल्क २०० रुपये होती ते आज १० हजार झालेली आहे. हे शुल्क प्रशासनाने कमी करावे. तसेच कोरोना काळात शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपये मदत जाहीर केली होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे रिक्षाचालकांचे खात्यावर पैसे जमा होत नाही. आदींबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
फोटो १३ आरटीओ
ओळी-रिक्षाचालकांना परवाना शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे करण्यात आली.