खारेकर्जुने येथे निकामी बॉम्बचा स्फोट; तीन जण ठार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 13:10 IST2020-02-14T13:09:54+5:302020-02-14T13:10:35+5:30
लष्कराच्या के. के. रेंजच्या हद्दीतून आणलेला बॉम्ब निकामी करीत असताना त्याचा स्फोट होऊन तीन जण जागीच ठार झाले. ही घटना नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

खारेकर्जुने येथे निकामी बॉम्बचा स्फोट; तीन जण ठार?
अहमदनगर : लष्कराच्या के. के. रेंजच्या हद्दीतून आणलेला बॉम्ब निकामी करीत असताना त्याचा स्फोट होऊन तीन जण जागीच ठार झाले. ही घटना नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
समजलेली माहिती अशी की, के.के. रेंज हद्दीत लष्कराचा दारूगोळा उडविण्याचा सराव चालतो. सराव संपल्यानंतर परिसरातील काही लोक येथे निकामी झालेल्या बॉम्बचे भंगार गोळा करण्यासाठी लष्करी हद्दीत जातात. निकामी झालेले बॉम्ब गोळा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्त केली आहे. मात्र खारेकर्जुने येथील काही लोक ठेकेदारांची नजर चुकून लष्करी हद्दीमध्ये शिरून हे बॉम्बचे भंगार साहित्य गोळा करतात.
आजचा प्रकारही असाच घडला. येथील काही तरुण निकामी झालेले बॉम्बचे भंगार गोळा करण्यासाठी शुक्रवारी सकाळी गेले होते. तेथे त्यांना भरलेला बॉम्ब सापडला. तो त्यांनी माळरानावर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी या बॉम्बचा स्फोट झाल्याने त्यात तीन तरुण ठार झाल्याचे समजते. मृताची नावे अद्याप समजली नाहीत. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीही अशा घटना येथे घडल्या आहेत.