टँकर दुरूस्ती करताना स्फोट : एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:21 IST2018-11-22T17:21:39+5:302018-11-22T17:21:43+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे रिकाम्या डिझेल टँकरचा दुरुस्ती करत असताना स्फोट होऊन संदीप भालेकर हे ठार झाला.

टँकर दुरूस्ती करताना स्फोट : एक ठार, एक जखमी
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे रिकाम्या डिझेल टँकरचा दुरुस्ती करत असताना स्फोट होऊन संदीप भालेकर हे ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
संदीप संभाजी भालेकर (वय ३५) यांचे देव दैठण येथे विश्वकर्मा वेल्डींगचे दुकान आहे. ड्रायव्हर गणेश गायकवाड यांनी टँकर दुरुस्तीसाठी आणला होता. त्याचा पाणी वाटपासाठी वापर करायचा होता. त्यासाठी आत उतरून वेल्डींगच्या साह्याने आतला पत्रा कट करायचे काम सुरू होते. पण काही वेळानंतर टँकरच्या टाकीमध्ये गॅस निर्माण होऊन प्रचंड मोठा स्फोट झाला. फोटानंतर टँकरच्या टाकीतून भालेकर यांना बाहेर काढणे अवघड झाले होते. स्थानिक तरुणांनी दोन जेसीबीच्या साह्याने टँकर तोडून त्यांना बाहेर काढले. जखमी अवस्थेत भालेकर यांना उपचारासाठी शिरूर येथे हलवल.े तेथेच त्यांचे निधन झाले. तर ड्रायव्हर गणेश गायकवाड ( देवदैठण ) हा गंभीर जखमी झाला असून शिरूर येथे उपचार सुरू आहे .
पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक रामेश्वर घुगे, हवालदार रावसाहेब शिंदे, गोरख गायकवाड करत आहेत.