शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याला मुदतवाढ

By admin | Updated: August 1, 2014 00:23 IST

विखे यांची माहिती : १६ आॅगस्टपर्यंत सहभागी होता येणार

बाभळेश्वर (अहमदनगर) : पावसाअभावी यंदा खरिपाच्या पेरण्या वेळेत होऊ शकल्या नाहीत़ उशीरा पाऊस झाल्याने अनेक भागात उशीरा पेरण्या झाल्या़ त्यामुळे अनेक शेतकरी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार होते़ उशीरा पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेत सहभाग घेता यावा, यासाठी विमा योजनेची दुसऱ्यांदा मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली़खरीप हंगामातील पिकांचे नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळून तीव्रता कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात येते़ या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत विमा रक्कम भरण्यासाठी मुदत वाढविण्यात आली होती़ मात्र यावर्षी पावसाचे आगमन उशीरा झाल्याने वेळेत पेरण्या होऊ शकल्या नाहीत़ उशीरा पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती़ ज्या शेतकऱ्यांना हवामानावर आधारित पीक विमा योजनेत सहभागी होता आले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना आता राष्ट्रीय पीक विमा योजनेत १६ आॅगस्टपर्यंत सहभागी होता येणार असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले. खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पीक विमा योजनेचा आधार घेता येईल, असे विखे यांनी सांगितले़ (वार्ताहर)