भेंडा खुर्द येथे सही पोषण देश रोशन कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:25 IST2021-09-12T04:25:22+5:302021-09-12T04:25:22+5:30

भेंडा : नेवासा पंचायत समिती, एकात्मिक बाल विकास सेवा योजना तसेच भेंडा खुर्द ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सही पोषण, ...

In the excitement of the signature nutrition country illumination program at Bhenda Khurd | भेंडा खुर्द येथे सही पोषण देश रोशन कार्यक्रम उत्साहात

भेंडा खुर्द येथे सही पोषण देश रोशन कार्यक्रम उत्साहात

भेंडा : नेवासा पंचायत समिती, एकात्मिक बाल विकास सेवा योजना तसेच भेंडा खुर्द ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सही पोषण, देश रोशन अभियान कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी सरपंच सुनील खरात होते. दिलीप मापारे, विलास खरात आदी उपस्थित होते. तत्पूर्वी उपस्थित सर्व अंगणवाडी सेविकांनी गावातून घोषणा देत फेरी काढली होती. सही पोषण देश रोशन अभियानात कुपोषण निर्मूलन, स्त्री भ्रूणहत्या याबाबत रंजना खरात व आशा खरात यांची भाषणे झाली. यावेळी पोषण आहारासाठी घरगुती उपलब्ध साहित्य व वस्तू पासून तयार केलेली सकस आहाराची प्रात्यक्षिक मांडणी करण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते बेबी किटचे वाटप करण्यात आले. या अभियानात गरोदर माता, स्तनदा माता, युवती उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविका सुरेखा नवले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

110921\img-20210910-wa0012.jpg

अंगणवाडी सजावट फोटो

Web Title: In the excitement of the signature nutrition country illumination program at Bhenda Khurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.