रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे पदग्रहण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:28 IST2020-12-30T04:28:04+5:302020-12-30T04:28:04+5:30
यावेळी माजी प्रेसिडेंट नितीन तोरडमल यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा घेतला. तर प्रा.विशाल मेहेत्रे यांनी जुलैपासून आजपर्यंत कोरोनाच्या ...

रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे पदग्रहण उत्साहात
यावेळी माजी प्रेसिडेंट नितीन तोरडमल यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा घेतला. तर प्रा.विशाल मेहेत्रे यांनी जुलैपासून आजपर्यंत कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. यावेळी कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, गटविकास अधिकारी अमोल जाधव व तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या सर्व बोर्ड ऑफ डायरेक्ट यांचा सन्मान करण्यात आला. राहुल खराडे, उत्तम मोहोळकर, ओंकार तोटे, अक्षय राऊत, नामदेव गायकवाड, सुरेश वाकचौरे, गोविंद जाधव, अविनाश पुराणे, रवींद्र राऊत, डॉ. अद्वैत विलास काकडे या नूतन रोटरी सदस्यांचे रोटरी परिवारात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, वन्यजीव अधिकारी सागर केदार, कर्जत शहरातील सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी रोटरी सदस्य सहकुटुंब उपस्थित होते.
...
फोटो-२९कर्जत रोटरी
...
ओळी- रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे पदाधिकारी पदभार स्वीकारताना.