राहुरी महाविद्यालयाला उत्कृष्ट पुरस्कार

By Admin | Updated: August 10, 2016 00:23 IST2016-08-09T23:53:48+5:302016-08-10T00:23:40+5:30

राहुरी : राहुरी महाविद्यालयाला सलग दुसऱ्यांदा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर झाला आहे़ उत्कृष्ट विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून उपप्राचार्य सूर्यकांत गडकरी

Excellent award for Rahuri College | राहुरी महाविद्यालयाला उत्कृष्ट पुरस्कार

राहुरी महाविद्यालयाला उत्कृष्ट पुरस्कार


राहुरी : राहुरी महाविद्यालयाला सलग दुसऱ्यांदा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर झाला आहे़ उत्कृष्ट विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून उपप्राचार्य सूर्यकांत गडकरी यांची पुरस्कारासाठी निवड झाली, असल्याची माहिती प्राचार्य डॉ़ संभाजीराव पठारे यांनी दिली़
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्या विविध योजना व इतर उपक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे़ १६ आॅगस्ट रोजी कुलगुरू वासुदेव गाडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे़ सन्मानचिन्ह, रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन महाविद्यालयाचा गौरव करण्यात येणार आहे़

Web Title: Excellent award for Rahuri College