कोरोना विषाणू हद्दपार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:23+5:302021-07-21T04:15:23+5:30
महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ राहुरी तालुका यांच्या वतीने कोरोनाकाळामधील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना कोरोनायोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण ...

कोरोना विषाणू हद्दपार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे
महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ राहुरी तालुका यांच्या वतीने कोरोनाकाळामधील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना कोरोनायोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी (१९ जुलै) गाडगेबाबा आश्रमशाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चैतन्य उद्योगसमूहाचे अध्यक्ष गणेश भांड होते.
यावेळी राहुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई तनपुरे, प्रांताधिकारी दयानंद जगताप, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, नायब तहसीलदार गणेश तळेकर, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, जिल्हा मार्गदर्शक विलास कुलकर्णी उपस्थित होते.
रामगिरी म्हणाले, कोरोना ही जागतिक आपत्ती असून, यामध्ये आरोग्य विभाग, सफाई कर्मचारी, महसूल विभाग, अंगणवाडी सेविकांसह पत्रकारांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवले आहेत. सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी, तर प्रास्ताविक श्रीकांत जाधव यांनी केले. अध्यक्षीय सूचना बाळासाहेब कांबळे यांनी केल्या. आभारप्रदर्शन गोविंद फुणगे यांनी केले.
200721\img-20210719-wa0161.jpg
कोरोणा विषाणू हद्दपार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे - मंहंत रामगिरी महाराज