सर्वसामान्यांना शिवसेनेत न्याय मिळतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:02+5:302021-07-23T04:14:02+5:30
केडगाव : सर्वसामान्य जनतेला शिवसेनेत न्याय मिळत असल्यानेच तरुण वर्ग शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे ...

सर्वसामान्यांना शिवसेनेत न्याय मिळतो
केडगाव : सर्वसामान्य जनतेला शिवसेनेत न्याय मिळत असल्यानेच तरुण वर्ग शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केले.
नगर तालुक्यात दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसंपर्क अभियान सुरू आहे. जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, गोविंद मोकाटे, जिवाजी लगड, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, तालुका प्रमुख राजेंद्र भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुऱ्हाणनगर गणातील कापूरवाडी व ससेवाडी येथे शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्ले यांनी शिवसेनेत सर्वसामान्यांना न्याय मिळतो. शिवसेनेच्या काळात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असे विविध निर्णय घेण्यात आले आहेत. कोरोनामुळे विकासकामात अडचणी निर्माण झाल्या आहे. मुख्यमंत्री संवेदनशील असून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या धोरणानुसार कामकाज सुरू आहे, असे सांगितले.
गोविंद मोकाटे म्हणाले, शिवसेनेच्या मदतीने जेऊर आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध झाला. शिवसेना सर्वसाधारण व्यक्तींना मदत करणारा पक्ष आहे. सरकारच्या काळात अनेक समाजहिताचे निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सरपंच संभाजी भगत, उपसरपंच मारुती कचरे, ग्रा. पं. सदस्य सदाशिव धामणे, सचिन तोडमल, युवा सेना तालुका प्रमुख किरण वामन, राहुल शिंदे, संदीप निकम, गणेश भगत, जालिंदर तोडमल, बाबासाहेब ससे, सागर भिंगारदिवे, इमामपूर सरपंच भीमराज मोकाटे आदी उपस्थित होते.