अखेर भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला : सुजय विखे मंगळवारी करणार प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 19:29 IST2019-03-10T19:26:11+5:302019-03-10T19:29:24+5:30
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे हे मंगळवारी (दि.१२) मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

अखेर भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला : सुजय विखे मंगळवारी करणार प्रवेश
अहमदनगर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे हे मंगळवारी (दि.१२) मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुंबईच्या भाजप कार्यालयात दुपारी बारा वाजता हा प्रवेश होणार असल्याचे समजते. सुजय विखे यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघ काँगेसला सोडण्याची मागणी राष्ट्रवादीकडे केली होती. मात्र राष्ट्रवादीने अद्याप मतदारसंघ सोडलेला नाही. विखे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरही लढण्यास तयार होते. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादीने अद्याप या मतदारसंघाबाबत निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रवादीने विखे यांना ताटकळत ठेवल्याने आता आघाडीकडे उमेदवारी न मागता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सुजय विखे यांनी निश्चित केल्याचे सुत्रांनी सांगितले. ते एकटेच हे पक्षांतर करणार असून वडील राधाकृष्ण किंवा आई शालिनी विखे या मात्र काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात सुजय निखे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी या वृत्तास दुजोरा दिला.