पिंपळगाव माळवीत महिला ग्रामसंघाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:52+5:302021-03-06T04:20:52+5:30
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत प्रगती महिला ग्रामसंघाची स्थापना ...

पिंपळगाव माळवीत महिला ग्रामसंघाची स्थापना
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत प्रगती महिला ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली.
या महिला ग्रामसंघांतर्गत पंधरा महिला स्वयंसहायता समूह एकत्रित आले. या ग्रामसंघाच्या अध्यक्षपदी जयश्री खासेराव साबळे, सचिवपदी रूपाली सुरेश शिंदे, कोषाध्यक्ष शेख शरिफा अन्वर यांची सर्वानुमते निवड झाली.
या ग्रामसंघांतर्गत द्रारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी स्वयंसहायता समूहांना क्षमतावृद्धी व कौशल्य वृद्धी करणे, वित्तीय सेवा पुरविणे, शाश्वत उपजीविकेचे साधनही उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे अध्यक्ष जयश्री साबळे यांनी सांगितले.
महिला ग्रामसंघ तयार करण्यासाठी उमेदचे तालुका व्यवस्थापक ज्ञानेश्वर गव्हाणे, प्रभाग समन्वयक वैभव मोहिते, गट प्रेरिका सुप्रिया जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.