जैन सेलची स्थापना
By Admin | Updated: June 26, 2014 00:45 IST2014-06-25T23:49:41+5:302014-06-26T00:45:06+5:30
अहमदनगर : जैन समाजाला आता अल्पसंख्याक दर्जा मिळाला आहे. मात्र, दर्जा मिळूनही याबद्दलची माहिती अनेकांना नसून त्याचे फायदे काय आहेत.

जैन सेलची स्थापना
अहमदनगर : जैन समाजाला आता अल्पसंख्याक दर्जा मिळाला आहे. मात्र, दर्जा मिळूनही याबद्दलची माहिती अनेकांना नसून त्याचे फायदे काय आहेत. याची समाजाला माहिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक सेलची स्थापना करण्यात आली असून, याच्या माध्यमातून समाजबांधवांनी फायदा घ्यावा, असे संघटनमंत्री संदीप भंडारी यांनी सांगितले.
अ. भा. जैन अल्पसंख्याक सेलची नगर येथे स्थापना करण्यात आली. यानिमित्त धार्मिक परीक्षा बोर्ड येथे लावण्यात आलेल्या फलकाचे अनावरण भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक सुवेंद्र गांधी, विपुल शेटिया, शैलेश मुनोत, अजय बोरा, शहरमंत्री रवींद्र गांधी, सुमित वर्मा, पवन गांधी, प्रफुल्ल सोळंकी, शैलेश चंगेडिया, संभव काठेड, संदीप मुनोत, सिद्धार्थ पिपाडा, अमित सुरपुरिया, महेश गुगळे, अभिजीत मुथा, कुणाल जैन, सार्थक मुनोत, शिवम लुणिया, धनेश गांधी, सुंदरम लुणिया, समीर बोरा आदी मान्यवर उपस्थित होते.
भंडारी पुढे म्हणाले की, नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून अ. भा. जैन अल्पसंख्याक सेलचे काम चालणार आहे. समाजबांधवांना आवश्यक माहिती येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. समाजातील अनेकजण आजही वंचित असून, त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सेलच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)