गुंडेगावमध्ये विविध समित्यांची स्थापना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:55+5:302021-07-02T04:14:55+5:30
केडगाव : ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता, आरोग्य, बांधकाम, दक्षता, दारूबंदी, वन, तंटामुक्ती, शिक्षण अशा विविध ...

गुंडेगावमध्ये विविध समित्यांची स्थापना करा
केडगाव : ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता, आरोग्य, बांधकाम, दक्षता, दारूबंदी, वन, तंटामुक्ती, शिक्षण अशा विविध समित्या गठीत केल्या जातात. मात्र, गुंडेगाव ग्रामपंचायतीत या समित्यांची स्थापना झालेली नसल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या समित्यांची स्थापना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आगळे यांनी केली.
आगळे म्हणाले, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीमध्ये विविध समित्या गठीत करण्यात येतात. ग्रामपंचायतीमधून निवडून आलेल्या सदस्यांमधून एक सदस्य अध्यक्ष निवडला जातो. त्यामध्ये पाणीपुरवठा, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, तंटामुक्ती, वनग्राम, दक्षता, कृषी, वन, शालेय पोषण आहार समिती, अन्नधान्य पुरवठा समिती अशा विविध समित्या गठीत करण्यात येतात. मात्र, गुंडेगाव ग्रामपंचायतीमध्ये कारभार समितीविना चालला आहे. त्यामुळे गावातील समस्या मार्गी न लागता विकास खुंटत आहे.