तहसीलदाराविरुध्द कर्मचारी आक्रमक
By Admin | Updated: July 16, 2014 00:44 IST2014-07-15T23:22:28+5:302014-07-16T00:44:08+5:30
नेवासा : येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बी.एल. मोहरे यांच्या कारभारावर आक्षेप घेत कर्मचारी, कामगार तलाठी आक्रमक झाले आहेत.

तहसीलदाराविरुध्द कर्मचारी आक्रमक
नेवासा : येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बी.एल. मोहरे यांच्या कारभारावर आक्षेप घेत कर्मचारी, कामगार तलाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी तहसीलदाराच्या बदलीची मागणी करुन मागणी मान्य न झाल्यास अहसकार पुकारुन काम बंद आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला आहे.
नायब तहसीलदार कामगार तलाठी व कर्मचाऱ्यांना शिवराळ भाषा वापरतात, अशी या कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. त्यांनी या संदर्भात कामगार तलाठी व कर्मचाऱ्यांनी नेवाशाचे तहसीलदार हेमलता बडे यांना स्वतंत्र निवेदने दिली आहेत. निवेदनात त्यांनी अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्रार केली आहे.
नायब तहसीलदारांची इतरत्र तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे तलाठी संघाच्या ३९ सदस्यांनी केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)
लवकरच कारवाई
कर्मचारी व तलाठी संघाचे निवेदन मिळाले असून, येत्या दोन दिवसात नायब तहसीलदाराविरुध्द योग्य ती चौकशी करून वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात येईल.
हेमलता बडे, तहसीलदार, नेवासा