नगरच्या प्रांताधिकार्यांसह कर्मचाऱ्यावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 15:04 IST2019-01-28T14:54:08+5:302019-01-28T15:04:16+5:30
बेकायदेशीर मुरुम उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नगरच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

नगरच्या प्रांताधिकार्यांसह कर्मचाऱ्यावर हल्ला
ठळक मुद्देबेकायदेशीर मुरुम उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नगरच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. गाडेकर आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर डंपर घालून दगडफेक करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अहमदनगर : बेकायदेशीर मुरुम उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नगरच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी (28 जानेवारी) घडली आहे. गाडेकर आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्याच्या अंगावर डंपर घालून दगडफेक करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
एका कर्मचाऱ्याचा मोबाईल फोडून नुकसान केले. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद रस्त्यावरील तपोवन महालाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात डंपर चालकासह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.