साई संस्थानातील एक कर्मचारी कोरोनाबाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:28 IST2020-06-26T18:27:57+5:302020-06-26T18:28:27+5:30

शिर्डीत शुक्रवारी (दि.२६ जून) रोजी एक कोरोना  पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण साईसंस्थानचा कर्मचारी आहे. तो विद्युत विभागात कार्यरत असल्याचे राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.

An employee of Sai Sansthan in Corona | साई संस्थानातील एक कर्मचारी कोरोनाबाधीत

साई संस्थानातील एक कर्मचारी कोरोनाबाधीत

शिर्डी : शिर्डीत शुक्रवारी (दि.२६ जून) रोजी एक कोरोना  पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण साईसंस्थानचा कर्मचारी आहे. तो विद्युत विभागात कार्यरत असल्याचे राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून या रूग्णावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्याचा स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. हा रूग्ण श्रीराम नगरजवळील महाराणा चौक परिसरातील असल्याने हा परिसर सील करण्याची कार्यवाही नगरपंचायतीने तातडीने सुरू केली आहे. 

सदरचा रूग्ण साईबाबा संस्थानात विद्युत विभागात आहे. मात्र तो गेल्या १८ जूनपासून तो रजेवर आहे. महिनाभरापूर्वी शिर्डीत दोन रूग्ण आढळले होते. सध्या या रूग्णासह तालुक्यात दोन रूग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. उर्वरित  सर्व उपचार घेवून घरी परतले आहेत.

Web Title: An employee of Sai Sansthan in Corona