बचतीबरोबर रोजगार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:36 IST2021-02-05T06:36:04+5:302021-02-05T06:36:04+5:30
विखे म्हणाल्या, बचतीच्या माध्यमातून महिला संघटित झाल्या. परंतु यापुढील काळात महिलांनी स्वयंरोजगाराकडे वळणे आवश्यक आहे. महिलांनी केवळ बचतीच्या ...

बचतीबरोबर रोजगार करा
विखे म्हणाल्या, बचतीच्या माध्यमातून महिला संघटित झाल्या. परंतु यापुढील काळात महिलांनी स्वयंरोजगाराकडे वळणे आवश्यक आहे. महिलांनी केवळ बचतीच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास होत असला तरीदेखील महिलांनी आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी, आपल्या उपजत गुणांना संधी देण्यासाठी स्वयंरोजगारांतून आपलं अस्तित्व सिद्ध करावे. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम हा बचत गटाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असतो. या माध्यमातून विचाराचे आदानप्रदान होत असते. जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक रोजगार आणि रोजगाराभिमुख संधी उपलब्ध आहेत. महिलांच्या माध्यमातून एक स्वयंपूर्ण रोजगार करण्याचे काम जनसेवा फाऊंडेशन करीत आहे. जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून जे प्रकल्प सुरू आहेत या प्रकल्पाच्या माध्यमातून या महिलांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ऑनलाईन मार्केटिंगचादेखील अवलंब केला जात आहे. महिला ही काटकसर करून घर चालवत असताना ती आज बचत गटाच्या माध्यमातून आपला विकास साध्य करीत आहे. यापुढे महिलांनी केवळ बचत न करता गटातून उद्योजक व्हावे.
निर्मळ पिंपरी येथील महिला बचत गटाच्या समन्वयक मीनाक्षी निर्मळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महिलांना हळदी-कुंकवाचा वाण म्हणून कढीपत्ता आणि शेवग्याचे रोप देऊन आरोग्याचा नवा संदेश देण्यात आला.
( फोटो आहे)