शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Emotional Story: वडिलांच्या उपचारांसाठी तीन बहिणींची मैदानावर धावाधाव! बक्षिसांच्या रकमेतून औषधोपचार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 09:38 IST

सगळ्यांत मोठी शीतल बी. ए.च्या शेवटच्या वर्षात, तर भाग्यश्री प्रथम वर्षाला आणि साक्षी दहावीत शिकत आहे. या तिघी प्रशिक्षक श्रीरामसेतू आवारी, दिनेश भालेराव, समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली लहानपणापासून सराव करतात.

संदीप घावटेलोकमत न्यूज नेटवर्कदेवदैठण (जि. अहमदनगर) : सहाजणांचे कुटुंब, केवळ दीड एकर शेती त्यातच गेल्या १५ वर्षांपासून अर्धांगवायूने वडील अंथरुणावर खिळलेले, अशा परिस्थितीत चरितार्थाबरोबरच शिक्षण आणि वडिलांचे औषधोपचार यासाठी लागणाऱ्या पैशासाठी तिघी बहिणींची देशभर धावपळ सुरु आहे. धावण्याच्या स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून मुलींनी आजपर्यंत वडिलांवर उपचार केले आहेत. अळकुटी (ता. पारनेर) येथील भंडारी कुटुंबातील शीतल, भाग्यश्री आणि साक्षी  या तीन मुलींची ही प्रेरणादायी कथा आहे. 

तिघी बहिणी शिक्षणाबरोबरच धावण्याचा कठोर सराव करतात. सोबतच शेतीकाम, घरकाम व वडिलांची सेवाशुश्रृषा करतात. आई मोलमजुरी करते, तर नववीत शिकणारा भाऊ बहिणींना सरावाला वेळ मिळावा म्हणून आईला मदत करतो. तिघीही सुटीच्या दिवशी शेतात रोजंदारीवर कामाला जाऊन वडिलांच्या औषधांसह विविध स्पर्धेला जाण्यासाठी पैसे जमवितात. सगळ्यांत मोठी शीतल बी. ए.च्या शेवटच्या वर्षात, तर भाग्यश्री प्रथम वर्षाला आणि साक्षी दहावीत शिकत आहे. या तिघी प्रशिक्षक श्रीरामसेतू आवारी, दिनेश भालेराव, समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली लहानपणापासून सराव करतात.

देशभरातील मैदानांवर तिघींचाही दबदबा....शीतलने वरंगळ (तेलंगणा) राष्ट्रीय क्राॅस कंट्री स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. भुवनेश्वर ओरिसा येथील ऑल इंडिया युनिव्हर्सिटी फुल मॅरेथाॅन ४२ कि.मी. व मंगलोर कर्नाटक येथे बक्षिसे मिळवून मॅरेथॉन, क्रॉस कंट्रीच्या राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या.सांगली, नागपूर येथील राज्यस्तर क्रॉसकंट्री स्पर्धा, महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मुंबई मॅरेथॉन १६ कि.मी.मध्ये तिसरा क्रमांक. हिरानंदानी हाफ मॅरेथॉन ठाणे स्पर्धेत तिसरा क्रमांक, निर्भया मॅरेथॉन नाशिक पोलीस स्पर्धेत  दुसरा क्रमांक, टाटा अल्ट्रा  हिल मॅरेथॉन लोणावळा स्पर्धेत प्रथम क्रमांक असे घवघवीत यश मिळविले.

भाग्यश्रीनेही शीतलच्या पावलावर पाऊल ठेवत संगरूर - पटियाला, पंजाब येथील राष्ट्रीय स्पर्धा, नागालँड येथील राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या. तर राज्यातही विविध राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेत दबदबा निर्माण केला. साक्षीनेही  तिरूपती येथील सब-ज्युनिअर राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात ६०० मीटर धावण्यात देशात सातवा क्रमांक व चंदीगढ (पंजाब)) येथील ५५वी राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत २ कि.मी. स्पर्धेत देशात चौथा क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या. पुणे-फुलगाव व सांगली येथील राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.