शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरातील परळी पीपल्सच्या शाखेत ११ कोटी रुपयांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST

गुन्हा दाखल : आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग श्रीरामपूर : येथील परळी पीपल्स अर्बन मल्टीस्टेट सोसायटीच्या शाखेत ११ कोटी ...

गुन्हा दाखल : आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग

श्रीरामपूर : येथील परळी पीपल्स अर्बन मल्टीस्टेट सोसायटीच्या शाखेत ११ कोटी ४२ लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी संजय शिंदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींमध्ये तत्कालीन उपाध्यक्ष नितीन घुगे, मुख्य व्यवस्थापक विश्वजित ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलेश मानुरकर व संचालिका निमिषा खेडकर, प्रमोद किसन खेडकर यांचा समावेश आहे. या सर्वांनी शाखाधिकारी व रोखपाल यांच्याशी संगनमत करून अपहार केल्याचे लेखापरीक्षण अहवालावरून निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा मोठ्या अपहाराचा तसेच गुंतागुंतीचा व अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

या सोसायटीच्या जिल्ह्यात श्रीरामपूरसह नेवासा, तिसगाव, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी येथे शाखा होत्या. या शाखांमध्ये ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. मात्र, मुदत पूर्ण होऊनही जर पैसे परत मिळालेले नसतील, तर त्यांच्या मूळ ठेव पावत्या व त्याच्या छायांकित प्रती गुन्ह्याच्या तपासासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे अशा ठेवीदारांनी या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

----------